Wednesday, February 11, 2015

लोकसत्ता मुम्बइ. आदरणीय महोदय , आजच्या बातम्यात आपचा विजय आणि bjp च्या पराभवाच्या बातम्या ऐकल्या ,आणि भारतीय समाजाच्या आणि जनमानसाच्या सुज्ञ पणाची खात्री पटली ,अखेर मतदार राजा हाच सर्व निवडणुकांचा सर्वार्थाने नायक असतो ,कोणाचाही उद्दामपणा तो चालवून घेत नाही ह्याचे हे समर्पक उदाहरण .लोकसभा जिंकली म्हणजे सर्वच जिंकले अथवा जिंकूच अश्या तोर्यात जर कुणी चालत असेल तर मतदार राजा त्या तोर्याचे तीनतेरा करायला फारसा वेळ लावत नाही ।कधि कधी असे वाटते कि माननीय पंतप्रधानांवर "परमेश्वरा तू माझ्या मित्रांपासून मला वाचव ,शत्रूंकडे मी यशस्वीरीत्या लढेन "असे म्हणण्याची पाळी येऊ नये म्हणजे मिळवली . एक उमदे व्यक्तिमत्व bjp ला पंतप्रधानांच्या रूपाने नेतृत्व करण्यासाठी प्राप्त झाले आहे ,त्यांना सहयोग करून राज्यकारभार सुरळीत पणे चालावू द्यावा हे पाहणे सोडून काही वाचाळ नेते नको तितके, नको ते आणि नको तिथे बोलून अडचणीत आणण्याचे गोरख धंदे करत आहेत. हा तमाशा असाच चालला तर कंटाळून जनता "इंद्राय सह तक्षकाय स्वाहा "करायला वेळ लावणार नाही. नाटकाची पहिली घण्टा वाजली आहे . दुसरी आणि तिसरी वाजायच्या आगोदर भाजपियांनी ह्यावर विचार मंथन जरूर करावे ,भारतीय राजकारणात निर्नायकी अथवा पोकळी येऊ नये म्हणून जवब्दारीने वागावे आणि बोलावे ,हीच काळाची गरज आहे ,आणि एक मराठी म्हण लक्षात ठेवावी कि "तेह्तीशी (तेहत्तीस कोटी देव)काय करेल ते बत्तीशी (बत्तीस दात वाणी)करेल . थोडक्यात उतू नकोस मातु नकोस घेतला वसा टाकू नकोस हाच इशारा मतदार राजांनी केला आहे. आणि समझदार को इशाराही काफी रेहता है ,संत कबीराच्या दोन ओळी आठवतात "माती सांगे कुंभाराला पाई मज तुडविशी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी . शशांक रांगणेकर --

No comments:

Post a Comment