Wednesday, February 11, 2015

Saleel

चिरंजीव सलील , रविवार दिनांक ८ रोजीलोकरंग ह्या पुरवणीतला तुझा कानगोष्टी हा लेख वाचला फार आवडला ,"आयुष्यावर बोलू कांही मधला आमचा लाडका सलील परत दिसला .तुझ्या ह्या कानगोष्टी तून तू काही रिकामटेकड्या आणि जगाच्या कल्याणाची आणि सार्वजनिक नितीमत्तेची काळजी जणू नियतीने आपल्याच शिरावर टाकली आहे असे समजून अक्षरशः "भाकणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांवर चपराक मारली आहेस ,काहीतरी अफवा पसरवणारी हि मुसोलिनीची अवलाद कित्येकांचे आयुष्य बरबाद करतात ,त्यांना सार्वजनिक नितीमत्तेची कसलीही चाड नसते ,जगात नर आणि मादी सोडून कुठलीही नाती ते मानत नाहीत ,असूया हा स्थायी भाव प्रगत करत हे वाचाळवीर अफवा पसरवण्याचे काम सातत्याने करत असतात .,समाजजीवन कलुषित करून आपली कंडू शमवणे हेच ह्या लोकांचे काम असते ,आणि आशय लोकांच्या माकड चाळ्यांकडे दुर्लक्ष करणे बरयाच वेळा परवडणारे नसते कारण "म्हातारी मेल्याचे दुक्ख्ख नाही पण काळ सोकावतो ,अश्या प्रवृत्तींवर सामाजिक बहिष्कार घालून सुसंस्कृत मराठी समाजानी एक नवीन दिशा दाखवावी .तुझ्या कानगोष्टी तून ह्याला तोंड फोडले आहेस ,ह्या अपप्रवृत्तींना अंशतः आळा घालण्याचे काम स्पृहणीय आहे ,असेच लिहत जा ,तुझ्या भावी लिखाणाला आणि तुला अनेक आशीर्वाद . तुझा काका शशांक रांगणेकर . ता. क. हे काका पुतण्याचे नाते आपल्या वयातला फरक आणि तुझ्या बद्दलची आपुलकी दर्शक आहे -- शशांक रांगणेकर ९८२१४५८६०२ -- From The Dessk of Shashank 207 B,Planet Industrial Premises Co-op Society Limited, Subhash Road, Vile Parle (East) , Mumbai - 400 057 India Tel :91-022- 26144220,91-022-26120460 Fax : 91-022-26135682

No comments:

Post a Comment